Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

एखादी दुर्धर व्याधी मागे लागणे हीच मूळात सोपी गोष्ट नाही

मग एखादा महत्वाचा  रिपोर्ट सापडत नाही म्हणून उपचारात काही चूक  झाली तर?

कशासाठी  हे  ट्रान्सप्लांट केअर अॅप ?

अवयव प्रत्यारोपणाची गरज पडलेल्या व्यक्ति दीर्घकाळ आजारी असतात. त्यामुळे सतत चाचण्या आणि उपचार करावे लागतात. दर महिन्याला लॅब रिपोर्ट्स आणि बाकी तपासण्या,परिणामी कागदांचे गठ्ठे वाढताच जतात.

कागदी अहवाल कधी कधी फाटतात, चुरगळतात किंवा हरवू शकतात.

तुमचे ट्रान्सप्लांट केअर अॅप तुमच्या सर्वं तपासण्या आणि उपचारांच्या नोंदी अगदी सुरक्षित ठेवेल, नेहेमीसाठी.

अवयव प्रत्यारोपण केलेल्या लोकांना प्रवासाची वेळ आली तर सगळ्या फाईल्स बरोबर बाळगणे गैरसोयीचे होते.

तुमचा मोबाईल फोन आणि त्यातील अॅप सदैव तुमच्या बरोबर राहू शकतो .

कागदी अहवालातील माहिती फायलींमध्ये पडून तशी निरूपयोगीच होते!

पण तुमच्या ट्रान्सप्लांट केअर अॅप मधली माहिती तुमच्या उपचारांना मदत करत राहाते, तुमची लक्षणे, तुमच्या चाचण्यांतील चढ उतार आपसूक दिसत राहतात, तुमच्या निदानासाठी त्याचा फायदा होतो.

ह्या अॅपचा उपयोग कसा करायचा ?

अवयव प्रत्यारोपण झालेल्या व्यक्तीस आयुष्यभर काळजी घेणे आवश्यक आहे.

ट्रान्सप्लांट केअर अॅप वापरुन आपण हे करू शकता: –

दररोजची निरीक्षणे सहजपणे नोंदवा.

रक्त तपासण्यांचे निकाल, विषेशतः आकडे नोंदवा.

प्रत्यारोपणापूर्वीच्या सर्व विशेष तपासण्यांचे अहवाल ठेवा.

एमआरआय आणि इतर रेडिओलॉजी अहवाल अपलोड करा.

लक्षणे किंवा गुंतागुंतांवर डॉक्टरांना सूचित करा.

डॉक्टरांकडून औषंधाची यादी आणि उपचारांची उत्तरे थेट अॅपमध्ये मिळवा.

ह्या चित्रात एका प्रत्यारोपण झालेल्या रुग्णाचा ३ वर्षांचा रोजच्या नोंदींचा आलेख आहे. रक्तातील वाढते साखरेचे प्रमाण सहज लक्षात येते. डॉक्टर ह्या रुग्णाला HbA1C ही चाचणी करून घायला सांगतात, कोणतीही बाह्य लक्षणं दिसण्याच्या आधीच मधुमेहाचे निदान होऊन वेळेत औषध सुरु होते.

ट्रान्सप्लांट केअर अॅपबद्दल महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवा!

हे अॅप कसे नेमके कसे काम करेल ?

तुम्ही खाते उघडतांना तुमचे प्रत्यारोपणाचे अवयव बरोबर निवडा.
आपल्या अवयवाच्या प्रकाराशी संबंधित आणि आपल्या स्टेजवर निर्दिष्ट असलेल्या पॅरामीटर्सचे आपोआप मार्गदर्शन केले जाईल.

माझा डेटा सुरक्षित राहील का

आपला डेटा सुरक्षित आणि संरक्षित सर्व्हरमध्ये राहतो. आपण आपला मोबाइल फोन गमावला तर आपला डेटा गमावला जाणार नाही. कोणीही आपल्या  डेटाचा गैर वापर करू शकणार नाही.

माझ्या डॉक्टरांना माझा डेटा दिसेल का?

आपण प्रथम आपल्या डॉक्टरांची नोंदणी करावी. फक्त आपले नोंदणीकृत डॉक्टर आपला डेटा पाहू शकतील आणि आपल्याला उपचार देऊ शकतील. दुसऱ्या कोणाही डॉक्टरला आपली कोणतीही माहिती दिसणार नाही.

लगेच सुरुवात करा, उशीर कशाला?

एक संपूर्ण अॅप, सुरक्षित, स्मार्ट आणि अवयव प्रत्यारोपणच्या खबरदारीचे.  तत्पर राहा , सतर्क राहा , आपले आरॊग्य सांभाळा.